मराठी भाषा दिन | Marathi Bhasha Din
जगामध्ये सर्वाधिक स्थानिक भाषिक बोललेल्या भाषांच्या यादीत मराठी भाषा हि दहाव्या क्रमांकावर आहे. हि खुप मोठी मराठी भाषिकांसाठी आनंदाची बाब आहे. मराठी भाषा १० करोडहुन अधिक लोकांद्वारे बोलली जाते. Marathi Bhasha Din
मराठी भाषा दिन हा कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेत कविता लिहून मराठी भाषा अतिअत्युच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे, याचा गौरव म्हणून भारत सरकारने कवी कुसुमाग्रजांनी सन १९९१ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
Quick Links
मराठी भाषा दिन कोट्स | Marathi Bhasha Din Quotes
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेची धन्य ऐकतो मराठी…
धर्म , पंथ एक जाणतो
मराठी ! एवढ्या जगात माय मानतो मराठी”
“सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा”
“मराठी भाषा दिनानिम्मित्त करू मराठी भाषेचा सन्मान,
राखू मराठीचा अभिमान आणि करू मराठीचा जय जय कार”
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी ।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका।।
भाषा मारता देशही मारतो संस्कृतीचा हि दिवा विझे ।
गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका ।।
मराठी भाषा दिन कविता | Marathi Bhasha Din Kavita
कवी कुसुमाग्रज याची प्रचंड गाजलेली कविता, मराठी दिन कविता
कणा
ओळखलत का सर मला ? पावसात आले कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे ,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा !
__ कवी कुसुमाग्रज
अखेर कमाई
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
__ कवी कुसुमाग्रज
मराठी भाषा दिनाच्या आपणास खुप खुप शुभेश्च्या. कृपया हि पोस्ट शेअर करा.
Marathi Bhasha Din
Marathi Bhasha Din Kavita
Marathi Bhasha Din Quotes
You may also like 👉 RTE Admission 2022-2023
जाणून घ्या रामिक सिद्धू यांची बियोग्राफी